कणकवली : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यानंतर दामदुप्पट परतावा मिळण्याचे आमिष दाखवून सौरभ भिसे यांची ७ लाख २३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल असलेल्या महिलेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. कोकिसरे खांबलवाडी येथील विनया स्वप्नील बेलेकर (४१) हिला कणकवली पोलिसांनी २२ मे रोजी ओरोस येथून अटक केली होती. त्यानंतर विनया बैठकर हिला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.