सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा पोल्ट्री फार्मर संघटनेने कुडाळ – मालवणचे महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना बिनशर्त पाठिंबा देण्याचे ठरवले आहे.
पोल्ट्री व्यावसायिकांना प्रति किलो मागे ६/- रु. ऐवजी ७/- रु. मिळवून देत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोल्ट्री व्यवसायासाठी निलेश राणे यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. त्यांनी केलेल्या या सहकार्याची परतफेड म्हणून म्हणून महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना बिनशर्त पाठिंबा देत मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचे सिंधुदुर्ग जिल्हा पोल्ट्री फार्मर संघटनेने ठरवले आहे.