ब्यूर न्यूज: पूर्व-मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, येत्या ३६ तासांत ते अधिक तीव्र होऊन ‘शक्ती’ या चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ उत्तरेकडे सरकणार असून याचा थेट फटका महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीला बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण कोकण किनारपट्टीवर ऑरेंज अलर्ट, तर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.
मासेमारीसाठी न जाण्याचे स्पष्ट निर्देश
वाऱ्याचा वेग काही भागांत ६० किमी/ताशीपर्यंत पोहोचू शकतो.मच्छीमारांसाठी सावधानतेचा इशाराहवामान खात्याने (IMD Alert), मच्छीमारांना पुढील दोन ते चार दिवस महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवर मासेमारीसाठी न जाण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. समुद्र खवळलेला असून धोका वाढला आहे.रायगड जिल्ह्यात पावसाचा जोरदार फटका .सावध रहा, सुरक्षित रहाहवामान खात्याने (IMD Alert) नागरिकांना अत्यंत सावध राहण्याचे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. रेड आणि ऑरेंज अलर्ट असलेल्या भागांमध्ये स्थानिक प्रशासनाकडून आपत्कालीन उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.