चेंदवण : श्री देवी माऊली पाताळेश्वर देवस्थानचे अध्यक्ष, सचिव, खजिनदार तसेच सदस्यांनी श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवण हायस्कूलला भेट दिली. यावेळी विद्यालयात नुकतीच सुरू झालेल्या संगीत वर्गासाठी आर्थिक मदत करण्याचे आश्वासन पदाधिकाऱ्यांनी दिले.
शाळेतील सांस्कृतिक उपक्रमांना चालना मिळावी यासाठी हार्मोनियम, ढग्गा व तबला देण्याचेही मान्य करण्यात आले. या प्रसंगी अध्यक्ष संजय परब, सचिव बाबा उर्फ रामचंद्र परब, खजिनदार विजय मेस्त्री यांच्यासह सदस्य राजू पोयरेकर, नारायण शृंगारे, संतोष प्रभू, समीर गाडी, सुभाष चेंदवणकर, सूर्यकांत शृंगारे, निलेश गुरव मान्यवर उपस्थित होते.
” शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणखी काही उपक्रम राबविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,” असे अध्यक्ष संजय परब यांनी सांगितले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन मुख्याध्यापकांनी केले व आभार मानले.