रानडुक्कर मारण्यासाठी ठेवलेला गावठी बॉम्ब बैलाने चावला ; बैल जखमी

अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल

कणकवली : रानडुकराला मारण्यासाठी फोंडाघाट, पावणादेवीवाडी येथे अज्ञात व्यक्तीने गावठी बाँब ठेवला होता. सदरचा बॉम्ब चरायला गेलेल्या बैलाने चावल्याने बॉम्बचा स्फोट स्फोट झाला. या स्फोटात बैल गंभीर जखमी झाला आहे. यात जखमी झालेल्या बैलाचा जबडा फाटला आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी ८.१५ वाजण्याच्या सुमारास घडली.

राजन वसंत तेली यांनी आपली गुरे शुक्रवारी सकाळी ७ वा. च्या सुमारास चरायला सोडली होती. राजकुमार देसाई यांच्या घरासमोरील जंगलमय भागात ती गुरे चरत असताना त्यातील एका बैलाने रानडुकर मारण्यासाठी ठेवलेला गावठी बाँब चावला. त्यामुळे स्फोट होवून त्या बैलाचा जबडा फाटला आहे. त्यामुळे राजन तेली यांचे सुमारे १२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

राजन तेली यांनी कणकवली पोलिस ठाण्यात या घटनेबाबत तक्रार नोंदवली आहे. त्यानुसार अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार उत्तम वंजारे करत आहेत.

error: Content is protected !!