कणकवलीत भाजपच्यावतीने जल्लोष करत मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार
कणकवली : जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. त्या बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कणकवली भाजपच्या वतीने आभार व्यक्त करून जल्लोष करण्यात आला. यावेळी कणकवली येथील खा. नारायण राणे यांच्या संपर्क कार्यालयासमोर भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोदी साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है! अशा घोषणा दिल्या. तसेच फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.
यावेळी युवमोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे, समीर प्रभूगावकर, सचिन पारधीये, गणेश तळगावकर, बबलू सावंत, विजय चिंदरकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.