आंबोली एसटी बस मद्धे गोवा बनावटी दारूचे तीन बॅग सापडले

उत्पादन शुल्क विभागाची कारवाई.

आंबोली येथे उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या माहितीनुसार, ओरोस येथील पथकाने देवडग – बेळगाव एसटी बस गाडी मधील गोवा बनावटी दारु पकडली आहे. स्थानिक गुन्हा अनवे शाखेच्या मार्फत आणी अप्पर पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले यांच्या आदेशानुसार एसटी बस एका वेगळ्या कारवाई संदर्भात चेकिंग करण्याचे आदेश दिले होते. मात्र ती तपासणी करत असताना त्या गाडीची तपासणी केली असता गाडीत गोवा बनावटी दारू सापडली. जो पोलिसांना शोध होता त्या अमली पदार्थ? सापडलाच नाही त्या ठिकाणी त्या गाडीत सावंतवाडी येथून चढविलेला गोवा दारूच्या बॅग सापडल्या. त्या गाडीत बेवारस गोवाबनावटी दारुचे तीन बॅग सापडले. सदर बेकायदा दारुची किंमत 28 हजार सहासे रुपये किमती ची दारु जप्त करून, या कामी आर. बी. शेळके यांच्या, मार्गदर्शनाखाली पी.बी. काळशेकर, के. के. के. देसाई, आर. आर. खानोलकर, दिप क शिंदे यांनी ही कारवाई केली.

error: Content is protected !!