असलदे ग्रामपंचायतच्यावतीने दिवीजा वृध्दाश्रमात अन्नदान सेवा; पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन
कणकवली : असलदेत मत्स्य व्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा पालकमंत्री नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त असलदे ग्रामपंचायत व असलदे सोसायटी व भाजपाच्यावतीने दिविजा वृध्दाश्रमातील आजी – आजोबांसाठी अन्नदान सेवा ठेवण्यात आली. या सेवेबद्दल दिविजा वृध्दाश्रम संस्थेचे संदेश शेटये यांनी आभार मानले. तसेच दिवीजा वृध्दाश्रमातील आजी -आजोबांकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यासह महाराष्ट्राची विकासात्मक सेवा करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने आशिर्वाद देण्यात आले. तसेच यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी , पुढील वाटचालीत यश समृध्दी लाभण्यासाठी ईश्वर चरणी असलदे ग्रामस्थांनी प्रार्थना केली.
यावेळी पंचायत समिती सभापती हर्षदा वाळके, सरपंच चंद्रकांत डामरे , नांदगाव सरपंच रविराज मोरजकर , सोसायटी चेअरमन भगवान लोके , भाजपा सरचिटणीस पंढरी वायंगणकर ,उपसरपंच सचिन परब , व्हाईस चेअरमन दयानंद हडकर , उपाध्यक्ष रघुनाथ लोके, कमलेश पाटील, भाजपा युवामोर्चा शक्तीकेंद्रप्रमुख प्रविण डगरे ,माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष बाबाजी शिंदे , राजू तांबे , व्यवस्थापक संदेश शेटये आदींसह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Subscribe










