युवासेना पदाधिकारी यांची शासकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे धडक

शासकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे आज युवासेना पदाधिकारी यांनी डीन डॉक्टर अनंत दवंगे यांची भेट अनेक तक्रारींचा पाढा वाचला. झालेल्या चर्चेमध्ये मेडिकल कॉलेज व रुग्णालय येथे होत असलेल्या कंत्राटी भरती मध्ये बाहेरच्या जिल्ह्यातील लोकांना भरती करुन स्थानिकाना डावलत असल्याचे सांगण्यात आले,तसेच मेडिकल कॉलेज मध्ये पर जिल्ह्यातील कंत्राटदार कंत्राट घेऊन चुकीच्या पद्धतीने काम करत असल्याचे डीन श्री.दवंगे यांच्या निदर्शनास आणून दिले. जर बाहेरच्या जिल्ह्यातील कंत्राट दारावर कारवाई न झाल्यास युवासेने तर्फे आंदोलन छेडण्यात येईल असा संदेश डॉक्टर दवंगे यांना देण्यात आला.तसेच आमदार श्री निलेश राणे याना प्रेरित असणारे काम व्हावे अश्या सुचना देण्यात आल्या.

यावेळी युवासेना उपजिल्हा प्रमुख स्वरूप वाळके, युवासेना तालुका प्रमुख सागर वालावालकर, अनिकेत तेंडोलकर, विश्वास पांगूळ, अवधूत सामंत, भूषण गावडे,समीर परब,राहुल मोरजकर उपस्थित होते.

error: Content is protected !!