माजी जिल्हा बँक अध्यक्ष श्री. सतीश सावंत यांचा पर्यावरण संवर्धनाचा अनोखा उपक्रम
कणकवली : महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नितेशजी राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त माजी जिल्हा बँक अध्यक्ष श्री.सतीश सावंत यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने हरकुळ बुद्रुक मतदार संघातील शालेय विद्यार्थ्यांना 2,500 रक्तचंदन रोपांचे वाटप करण्यात आले. यामध्ये हरकुळ बुद्रुक मधील ल. गो. सामंत विद्यालय, उर्दू शाळा, जंगमवाडी शाळा या प्रशाळेतील विद्यार्थ्यांना रक्तचंदनची रोपे वाटप करण्यात आली.राणे साहेब यांना वाढदिवसानिमित्त अनोख्या शुभेच्छा सतीश सावंत यांनी दिल्या.
पर्यावरणाचे संतुलन राखणे ही काळाची गरज बनली आहे.जगभरात हवामान बदलाचे वाढते परिणाम,एल निनो (El Niño) सारख्या नैसर्गिक परिस्थितीमुळे निर्माण होणारे दुष्काळ,अवेळी पाऊस आणि तापमानवाढ यांचा विचार करून पर्यावरण संवर्धनासाठी एक स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे.प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आईच्या नावाने एक झाड लावावे,त्याचे संगोपन करावे आणि पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी स्वीकारावी,हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.रक्तचंदन हे आर्थिक,औषधी आणि पर्यावरणीय दृष्ट्या महत्त्वाचे वृक्ष मानले जाते.या वृक्षांची लागवड मोठ्या प्रमाणावर झाल्यास भविष्यात हरित पर्यावरण निर्मितीस मदत होणार असून विद्यार्थ्यांमध्ये वृक्षसंवर्धनाची जाणीवही निर्माण होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यावरण संवर्धनासाठी राबविण्यात येणारा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरणार असून,पालकमंत्री श्री.नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम सर्व स्तरातून कौतुकास पात्र ठरत आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हरित सिंधुदुर्ग आणि पर्यावरणपूरक भविष्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
यावेळी माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, पंचायत समिती सदस्य सौ. दिव्या पेडणेकर, सरपंच आनंद ठाकूर, बाबासाहेब वर्देकर, राजू पेडणेकर, नित्यानंद चिंदरकर, नारकर गुरुजी, बाळू मोर्ये, मामा माणगावकर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. नवाळे मॅडम आदी शिक्षक व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Subscribe










