मुख्यकार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्या सकल्पनेतुन उपक्रमाची सुरुवात करणारी पहीली ग्रामपंचायत!
कुडाळ : मुख्यकार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी जिल्ह्याचा कारभार हाती घेतला आणि स्वच्छता या विषयावर अधिक भर दीला त्याचाच एक भाग म्हणून हुमरमळा वालावल ग्रामपंचायतीने प्रत्येक घरामध्ये दोन डसबिंन देण्याचा शुभारंभ मा पंचायत समिती सदस्य अतुल बंगे व सरपंच श्री अमृत देसाई व पोलीस पाटील श्री सुबोध सावंत यांच्या हस्ते देण्यात आले.
महाराष्ट्र दीनाचे औचित्य साधून हुमरमळा वालावल ग्रामपंचायतीने मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीना स्वच्छता उपक्रम राबविण्याचे आदेश दीले आहेत. याचाच एक भाग म्हणून हुमरमळा वालावल ग्रामपंचायतीने ओला कचरा व सुका कचरा प्रत्येक घरामधे दोन डसबिंन व प्रत्येक घराजवळ एक शोष खड्डा यांचा शुभारंभ आज करण्यात आला. खरंतर हुमरमळा वालावल ग्रामपंचायत ही जिल्ह्यातील आदर्श ग्रामपंचायत म्हणून नावारूपाला आली असुन ही ग्रामपंचायत मा पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना सरपंच श्री अमृत देसाई यांची कार्यपद्धती चांगली असुन ग्रामसेवीका श्रीम अपर्णा पाटील ह्या सुध्दा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त असुन काम करण्याची पद्धत चांगली आहे तसेच गावात नवनवीन उपक्रम राबविण्यात येत असुन आज झालेल्या या शुभारंभ प्रसंगी मा पंचायत समिती सदस्य अतुल बंगे, सरपंच श्री अमृत देसाई, उपसरपंच सौ रश्मी वालावलकर, ग्रामपंचायत सदस्या सौ संजना गुंजकर, पपु दळवी, प्रमोद वेंगुर्लेकर, शैलेश मयेकर, अमित बंगे, पोलीस पाटील श्री सुबोध सावंत उपस्थित होते.