आरवलीच्या श्री. देव वेतोबाचा वर्धापन दिन उद्या

आरवली : आरवली येथील देव वेतोबाचा वर्धापन दिन सोहळा शुक्रवार, २ मे रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.

गुरुवार, १ मे रोजी सकाळी ८ पासून धार्मिक विधी, सायंकाळी
६ वाजता कै. लालाजी देसाई संगीत विद्यालय आयोजित नाट्यगीत गायन कार्यक्रम, रात्री १० वाजता ‘श्रीं’ची पालखी प्रदक्षिणा होणार आहे. शुक्रवार, २ मे रोजी वाढदिवस कार्यक्रम, सकाळी ८ वाजता लघुरुद्राभिषेक, पूर्णाहुती, बलिदान आदी धार्मिक विधी, दुपारी १ वाजता महाआरती, महाप्रसाद, रात्री १० वाजता ‘श्रीं’ची पालखी प्रदक्षिणा, १०.३० वाजता देव रवळनाथ नाट्य मंडळ, तेंडोली अंतर्गत श्रींची इच्छा कलामंचतर्फे य. ना. टिपणीस लिखित दोन अंकी ऐतिहासिक नाट्यपुष्प ‘नेकजात मराठा’ सादर होणार आहे. शनिवार, ३ मे रोजी सकाळपासून धार्मिक कार्यक्रम, सायंकाळी ७ वाजता ‘ऑर्केस्ट्रा सरगम म्युझिकल नाईट’, रात्री १० वाजता ‘श्रीं’ची पालखी प्रदक्षिणा होणार आहे.

तरी या सोहळ्यास भाविकांनी उपस्थित राहून श्रींचा आशीर्वाद घ्यावा, असे आवाहन देव वेतोबा देवस्थान समिती, आरवलीने केले आहे.

error: Content is protected !!