बांदा येथे झालेल्या अपघातात वृद्धाचा जागीच मृत्यू

बांदा : अज्ञात वाहनाने मागून धडक दिल्यामुळे बांदा-सटमटवाटी येथे झालेल्या अपघातात डेगवे येथील वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. उत्तम दत्ताराम पडवळ (वय ६७) असे त्यांचे नाव आहे. गंभीर बाब म्हणजे धडकेनंतर ते सुमारे दहा ते पंधरा फूट फरफटत गेले. ही घटना आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. चार दिवसापूर्वी बांदा येथे इन्सुली येथील एका युवकाचा मृत्यू झाला होता. ही घटना समजल्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.

error: Content is protected !!