अंतराळातील अंतरंगाच्या अंतरंगात दडलंय काय? खरं तर हे जाणून घ्यायची उत्सुकता प्रत्येकाच्याच मनात असते पण ते जाणून घेणे तसं ते उघड्या डोळ्याने पाहाणे शक्य नसते , ते चेदवणच्या शाळेत 'डॉ. रमेश सावंत स्मृती विज्ञान केंद्र' विज्ञान केंद्र गोवा व चेंदवण शिक्षनोत्तेजक मंडळ चेंदवण मुबंई यांच्या प्रयत्नातून आयोजित आकाश दर्शन कार्यक्रमामुळे चेंदवण पंचक्रोशीतील शिक्षक, पालक, आणि विद्याथ्यांसाठी अगदी मोफत स्वरूपात आयोजित करण्यात आला होता. या उत्तम उपक्रमाचा चेंदवण पंचक्रोशीतील विध्यार्थी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ यांना अनुभव मिळाला.
कुडाळ तालुक्यातील चेंदवण हायस्कूल मध्ये आकाश दर्शन, आकाशाचे अंतरंग ग्रह तारे यांचे मार्गदर्शन व दुर्बीनी मधून आकाश दर्शन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उदघाटन शाळा संस्था उपाध्यक्ष शरद शृंगारे यांच्या अध्यक्षतेखाली शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष देवेंद्र नाईक, नेहरू विज्ञान केंद्राच्या शीतल चोपडे, आडेकर,आकाशवाणी सिंधुदुर्ग प्रतिनिधी निलेश (बंड्या )जोशी, दैनिक सकाळ चे कुडाळ प्रतिनिधी अजय सावंत सावंत, विठ्ठल राणे , सावंत फाउंडेशन चे सचिव शरद सावंत, शाळा समिती सदस्य संजय नाईक,संस्था सदस्य सूर्यकांत शृंगारे, यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रशालेच्या विध्यार्थिनींनी सुमधुर आवाजात इशस्तवन व स्वागत गीत गाऊन मान्यवरांना मंत्रमुग्ध केले. या वेळी प्रशालेच्या वतीने मान्यवरनाचे सत्कार करण्यात आले.या मध्ये नेहरू विज्ञान केंद्राच्या शीतल चोपडे , आडेकर,सावंत फाउंडेशन चे शरद सावंत,आकाशवाणी सिंधुदुर्ग प्रतिनिधी निलेश जोशी, दैनिक सकाळ चे अजय सावंत, कवठी पोलीस पाटील विठ्ठल राणे यांना शाल,श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक माणिक पवार यांनी केले तर सूत्र संचलन सहा शिक्षक संतोष सांगळे यांनी केले.
सावंत फौंडेशन संचालित डॉ. रमेश सावंत स्मृती विज्ञान केंद्र कळसुली (श्रीनगर )तालुका कणकवली जिल्हा ‘सिंधुदुर्ग . संस्था सिंधुदुर्ग विभाग आयोजित जिल्ह्यातील शालेय विध्यार्थ्यांसाठी विज्ञानाची ओढ निर्माण करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असते. विविध शैक्षणिक आणि सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी या संस्थे मार्फत करण्यात येतात. शनिवार दिनांक 26एप्रिल 2025 रोजी या कार्यक्रमाचे आयोजन श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवण तालुका कुडाळ , जिल्हा सिंधुदुर्ग येथे करण्यात आले होते.
अंतराळातील अंतरंगाच्या अंतरंगात दडलंय काय? खरं तर हे जाणून घ्यायची उत्सुकता प्रत्येकाच्याच मनात असते पण ते जाणून घेणे तसं ते उघड्या डोळ्याने पाहाणे शक्य नसते , ते चेदवणच्या शाळेत ‘डॉ. रमेश सावंत स्मृती विज्ञान केंद्र’ विज्ञान केंद्र गोवा व चेंदवण शिक्षनोत्तेजक मंडळ चेंदवण मुबंई यांच्या प्रयत्नातून आयोजित आकाश दर्शन कार्यक्रमामुळे चेंदवण पंचक्रोशीतील शिक्षक, पालक, आणि विद्याथ्यांसाठी अगदी मोफत स्वरूपात आयोजित करण्यात आला होता. या उत्तम उपक्रमाचा चेंदवण पंचक्रोशीतील विध्यार्थी, शिक्षक, पालक आणिग्रामस्थ यांना अनुभवण्यास मिळाला.
या कार्यक्रमाची सुरुवात शनिवार दिनांक २६ एप्रिल २०२५ रोजी दुपारी 3.30 वाजता गोवा सायन्स सेंटर ने आणलेल्या बस मधील २० प्रयोग दाखवून करण्यात आली. प्रथम शाळेच्या वीस मुलांना ते प्रयोग शिकविण्यात आले व त्यानंतर वीस वीस विद्यार्थ्यांचे गट करून प्रयोग समजावूनसांगितले आणि नंतर आकाश दर्शन उदघाटन दीप प्रज्वलन करून सरस्वती मातेचे पूजन झाले या नंतर इशस्तवन, स्वागत व मान्यवरांची मनोगते या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले संस्थेचे उपाध्यक्ष शरद शृंगारे यांनी कार्यक्रमाच्या पूर्वतयारीविषयी माहिती दिली. सावंत फौंडेशन चे सेक्रेटरी शरद सावंत यांनी आपल्या आज पर्यंतच्या सावंत फौंडेशनच्या 2002 च्या स्थापणेपासून आता पर्यंतच्या विविध कार्यक्रमांची माहिती प्रेझेंटेशन सहित दिली. यावेळी उपस्थित असलेल्या नेहरु सायन्स सेंटरच्या शितल चोपडे यांनी व आयुकाचे प्रसाद आडेकर यांनी ग्रह ,तारे, सुर्यमाला, गँलेक्सी , चंद्र व शुक्राच्या कला, ग्रहांचे चंद्र, ग्रहण व इतर सखोल माहीती विद्यार्थी व पालकांना पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या सहाय्याने दिली.तसेच तिथे आकाशदर्शनाच्या कार्यक्रमासाठी आणलेल्या दुर्बीणी व अवकाश दर्शनासाठी वापरल्या जाणाऱ्या इतर दुर्बीणींचीही माहीती सांगितली. याप्रसंगी महत्वाचे होते ते आकाशातील ग्रह व तारे यांचे दर्शन विद्यार्थ्यांना घडविणे.
यादिवशी व यावेळी आकाशात अवलोकानासाठी उपलब्ध असणारा गुरु, ग्रह सायंकाळ झाल्यानंतर सर्व उपस्थितांना मोठ्या दुर्बीणीने दाखविण्यात आला. त्यानंतर मंगळ व पहाटे ४…४५ मिनिटांनी अवकाशात शुक्र ग्रह,शनी ग्रहाचे तसेच आकाशातील वेगवेगळ्या नक्षत्रसमुहाचे दर्शन सर्व विद्यार्थी व पालक व ग्रामस्थना करण्यात आले.या कार्यक्रमासाठी आलेल्या गोवा सायन्स सेंटरचे प्रतिनिधी………. विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले याप्रसंगी 200 ते 300 विद्यार्थी व पालक , ग्रामस्थ , उपस्थित होते. मुख्याध्यापक एम. एच पवार,प्रशालेचे शिक्षक उमेश धर्णे, संतोष सांगळे,शरद नाईक,उर्मिला गवस,विजय कांबळी, सिद्धी कांबळी,निलेश तवटे, कौशल पोयरेकर आदी शिक्षक व शाळेतील कर्मचारी वर्ग तसेच देवेंद्र नाईक, संजय नाईक ,गोविंद भरडकर,कांबळी, आठलेकर, प्रमोद नाईक,…. आदी पदाधिकारी उपाध्यक्ष श्री शृंगारे यांचे मित्र श्री जाधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री बाळू मेस्त्री,नारायण शृंगारे,गौतम चेंदवणकर,सूर्यकांत शृंगारे, मिलिंद चव्हाण, सुचित साळसकर सचिन फणसेकर,अथर्व शृंगारे , कौशल पोयरेकर, साईल बखले, रामचंद्र शृंगारे , संकल्प रेंवडकर रोहित टुंबरे, वैष्णव मेस्त्री अक्षता मेस्त्री सौ परप आदी आजी माजी विद्यार्थी इतर ग्रामस्थ,महिला मंडळी यानी मदत केली या सर्वांचे प्रशालेच्या व संस्थेच्या वतीने जाहीर आभार व्यक्त करण्यात आले.तसेच सदर उपक्रमाचे आभार प्रदर्शन उमेश धर्णे यांनी केले व कार्यकमाची सांगता झाली..