बांदा : सावंतवाडी तालुक्यातील निगुडे गावात रामनवमीनिमित्त धार्मिक विविध कार्यक्रमाचं आयोजन श्रीदेवी माऊली मित्र मंडळ निगुडे यांनी आयोजित केला होता. यावेळी शनिवार दिनांक ०५ एप्रिल २०२५ रोजी रात्रौ ठीक ०९:०० वाजता श्री विघ्नहर्ता रामेश्वर दशावतार नाट्य मंडळ, निगुडे यांचा ब्रह्मसंबंध चुडामणी अर्थात गावराठी चालगती हा दणदणीत नाटक प्रयोग सादर करण्यात आला. व सकाळी रामनवमीनिमित्त ०९:०० वाजता श्री देवी माऊली मंदिर या ठिकाणी प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेला पुरोहित श्री राजन जोशी यांच्या मार्फत धार्मिक विधी कार्यक्रम करण्यात आले. त्यानंतर दुपारी महाआरती, महाप्रसाद व रात्री ग्रामस्थांची भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल होता .यावेळी रामभक्त मोठ्या संख्येने सकाळपासूनच मंदिरामध्ये गर्दी होती मोठ्या भक्तीमय वातावरणात रामनवमी उत्सव निगुडे येथे साजरा करण्यात आला. गावातील प्रमुख मानकरी गंगाराम उर्फ भाऊ गावडे सर यांच्या हस्ते महाआरती झाली. तसेच या कार्यक्रमाला मेहनत घेऊन माजी सरपंच समीर गावडे, माजी सैनिक नाना खडपकर, महेश गावडे, शांताराम गावडे सर, रवींद्र गुंडू गावडे, दिगंबर गावडे, माई दुरेकर, गुरुदास निगुडकर, बापू भास्कर गावडे, सागर राणे, पुरुषोत्तम गावडे, सचिन निगुडकर, शंकर निगुडकर , दीपक गावडे, महेंद्र गावडे, कृष्णा निगुडकर, संदीप राणे,राजेश मयेकर ,सर्वेश गावडे , तसेच महिला,शालेय विद्यार्थी आदी मोठ्या उपस्थित होते.तसेच सदर कार्यक्रमला पत्रकार श्री सिताराम गावडे, रोनापाल माजी सरपंच सुरेश गावडे, यांनी उपस्थिती लावली.















