कुडाळ : तालुक्यातील शिवापूर येथील शेतकरी विठोबा शिंदे (वय 60) गवा रेड्याच्या हल्ल्यात जखमी झाला.
शेतकरी विठोबा शिंदे सकाळी शेतामध्ये जात असताना सकाळी ८.३० ते ९.०० च्या सुमारास गवा रेड्यांनी हल्ला केला.हल्लात पोटाला मार लागल्याने स्थानिक नागरिक सुभाष सावंत,पोलीस पाटील श्री कदम अन्य नागरिकांच्या मदतीने सावंतवाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पोलीस पाटील यांनी वन विभागाला कळविल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी दाखल झाले.शिंदेंच्या घरी जाऊन विचारपूस केली.
कुडाळ वनक्षेत्रपाल श्री संदीप कुंभार व वसोली वनपाल घाटगे मॅडम तसेच कर्मचारी यांनी सावंतवाडी येथील रुग्णालयात जाऊन शेतकरी विठोबा शिंदे यांची विचारपूस केली. तसेच जखमी झालेल्या शिंदेंना औषध उपचार चा खर्च वनविभागाकडून केला जाईल असे आश्वासन वनक्षेत्रपाल श्री संदीप कुंभार यांनी कुटुंबीयांना दीली.