मनसेच्या भूमिकेला मराठा महासंघाचा पाठिंबा – ऍड. सुहास सावंत

कुडाळ : मनसे अध्यक्ष यांनी बँकेत मराठी न बोलणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात मोहीम सुरू करण्याचा आदेश महाराष्ट्र सैनिकांना दिला होता. मनसेच्या या भूमिकेला मराठा महासंघाचा पाठिंबा असल्याचे अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष ऍड. सुहास सावंत यांनी म्हटले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या भाषणात संबोधित करताना बँकेत मराठी न बोलणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात मोहीम सुरू करण्याचा आदेश महाराष्ट्र सैनिकांना दिला होता. मनसेच्या या आंदोलनाला अखिल भारतीय मराठा महासंघ, सिंधुदुर्गचा पूर्णपणे पाठिंबा असून महासंघाच्या कार्यकर्त्यांनी प्रसंगी या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन ऍड. सुहास सावंत यांनी महासंघाच्या कार्यकर्त्यांना केले आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्यांनी मराठी भाषा बोललीच पाहिजे अशी भूमिका आता मराठा महासंघाने देखील घेतली आहे.

error: Content is protected !!