मालवणमध्ये वाळूच्या डंपरवर कारवाई; तहसीलदार ॲक्शन मोडवर

मालवण : अनधिकृत वाळू वाहतूक डंपर विरोधात ऍक्शन मोडवर आलेल्या मालवणच्या तहसीलदार वर्षा झालटे यांनी आज धडक कारवाई केली. मालवण कोळंब रेवतळे सागरी महामार्गावर सायंकाळी एकूण सात डंपर ताब्यात घेण्यात आले तर दोन डंपर रस्त्यावरच वाळू ओतून पळून गेले.

मालवण च्या तहसीलदार वर्षा झालटे यांच्या नेतृत्वाखालील महसूल व पोलीस पथकाने ही कारवाई केली. विना पास वाळू वाहतूक करणारे सहा डंपर ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी मालवण तहसील कार्यालयात नेण्यात आले. तर करवाईच्या भीतीने पळून जाण्याचा प्रयत्न करणारा गोवा पासिंगचा एक डंपर सागरी महामार्गावर रस्त्याच्या कडेला कलंडला होता. तोही ताब्यात घेण्यात आला आहे. तसेच दोन डंपर चालकांनी महामार्गांवर वाळू ओतली व ते पळून गेले. अशी माहिती तहसीलदार वर्षा झालटे यांनी दिली.

error: Content is protected !!