सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापा-यांसाठी केंद्र सरकारने सौरऊर्जा विज योजना राबवावी; राम शिरसाट!

केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री ना श्रीपाद नाईक यांच्याकडे मागणी!


कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापारी सध्या वाढीव वीजबिले आणि अदानीं कंपनीच्या प्रीपेड मीटरमुळे जबरदस्त वाढीव बिले येत असल्याने व्यापा-यांना दीलासा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापा-यांसाठी सौरऊर्जा मोफत योजना केंद्र सरकारने राबवावी अशी मागणी व्यापारी संघटनेचे राम शिरसाट यांनी विज व उर्जा केंद्रीय राज्यमंत्री ना श्रीपाद नाईक यांच्याकडे केली.


श्रीपाद नाईक हे हुमरमळा वालावल येथे सामाजिक कार्यकर्ते अतुल बंगे यांच्या निवासस्थानी स्वामी प्रकट दीन कार्यक्रमासाठी आले असता श्री शिरसाट यांनी ना नाईक यांची भेट घेतली. यावेळी श्री शिरसाट यांनी सांगितले कि सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापारी ग्राहक पुर्ता हैराण झाला आहे एकिकडे व्यापारी चारही बाजूंनी संकटाना सामोरे जात असताना विजेची वाढती बिले आणि अदानी कंपनी चे प्रिपेड मिटर मुळे सध्या विज बिले भरमसाठ येत आहेत त्यामुळे व्यापारी जगला पाहिजे यासाठी केंद्र सरकारने सौरऊर्जा विज मोफत योजना राबविण्यात यावी अशी मागणी श्री शिरसाट यांनी केली यावेळी शिरसाट यांनी प्रत्यक्ष वस्तूस्थिती दाखवली. यावेळी ना श्रीपाद नाईक यांनी आपण सकारात्मक विचार करु असे सांगितले. यावेळी सरपंच श्री अमृत देसाई, अतुल बंगे, सौ अर्चना बंगे, उद्योजक प्रकाश परब, मा ग्रामपंचायत सदस्य शरद वालावलकर, सामाजिक कार्यकर्ते मितेश वालावलकर आदी उपस्थित होते

error: Content is protected !!