कोकणचा राजा थेट दुबईला रवाना

गोवळ : फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा हापूस आंबा. आमच्या राजाची चव न्यारीच ! आणि हापूस आंबा जगात भारी ! म्हणत देवगड तालुक्यातील गोवळ गावातील प्रगतशील आणि अभ्यासू शेतकरी अनिल चव्हाण तसेच नागेश बोडेकर , अजित बोडेकर , आशिष सोमले या युवा शेतकऱ्यांनी आपल्या बागेतील हापूस आंबा थेट दुबईला पाठविण्याची किमया केली आहे.

उन्हाळा म्हटलं की प्रत्येकाला आंब्याची चाहूल लागते. आंबा असं जरी म्हटलं तरीही प्रत्येकाच्या तोडांला पाणी सुटतं. विशेष म्हणजे आंबा हा शब्द उच्चारला तरी डोळ्यासमोर गोड, रसाळ, पिवळसर केशरी रंगाचा ‘हापूस आंबा’ दिसायला लागतो. हापूस आंबा हे कोकणच्या मातीतील उत्पादन आहे. कोकणातील देवगड पट्ट्यातील हापूस आंबा म्हणजे निसर्गाची किमया असल्याचे मानले जाते. उन्हाळ्याच्या दिवसात आमरस पुरीचा मनमुराद आनंद लुटणे ही तर जणू पर्वणीच आहे.

२० टक्के देवगड हापूस बाजारात उपलब्ध


कोकणातील हापूस आणि देवगड तालुक्यातील आंबा हा आपल्या वेगळ्या चवीसाठी जगभर प्रसिद्ध असून त्याला जगभरातून मागणी आहे. नैसर्गिक संकटं आणि असंख्य आव्हानं पेलत हापूस आंबा आता दुबईला सातासमुद्रापार पोहोचलाय. आखाती देशात हापूस आंब्याला चांगला दर मिळत आहे. आंबा फळ बाजारात हापूसची आवक वाढत असून, परदेशातून देखील हापूसची मागणी वाढत आहे. त्यामुळे याचा फायदा कोकणातील आंबा बागायतदारांना आणि शेतकरी वर्गाला होणार आहे.

यावर्षी आंब्याचे उत्पादन फार कमी आहे. सध्या देवगड हापूस साधारणपणे १५ ते २० % बाजारपेठेत उपलब्ध झाला आहे. एक्सपोर्ट मालाला परदेशात विशेष करुन मागणी आहे. चौघांनी मिळुन प्रायोगिक तत्त्वावर १ हजार डझन आंबे दुबईला पाठवले आहेत. आणखीही त्या ठिकाणाहून मागणी आहे. लवकरच त्याही पेट्या रवाना होतील. यापूर्व अनेक देशांत आपण हापूस आंबा पाठवला असल्याचेही त्यांनी माहिती दिली. आज कोकणातील शेतकरी दलालीला भिक न घालता थेट परदेशातील बाजारपेठ मध्ये आपला माल पाठवत आहे ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे.

error: Content is protected !!