ब्युरो न्यूज: म्यानमारमध्ये शुक्रवारी आलेल्या ७.७ रिश्टर स्केलच्या भूकंपाने संपूर्ण देश हादरून गेला आहे. या भूकंपामुळे आतापर्यंत अधिकृतपणे १,००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून २,२०० पेक्षा जास्त जण गंभीर जखमी झाले आहेत.पण ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध आणि बचाव कार्य सुरू असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या जियोलॉजिकल सर्व्हे (USGS) संस्थेने तर मृतांचा आकडा १०,००० पेक्षा जास्त होऊ शकतो, असा दावा केला आहे. या भूकंपामुळे म्यानमार सरकारने देशाच्या मोठ्या भागात आणीबाणी जाहीर केली आहे.हा भूकंप इतका जोरदार होता की त्याचे झटके थायलंडची राजधानी बँकॉकपासून ते भारताच्या मणिपूर आणि मेघालयापर्यंत जाणवले. थायलंडमध्येही यामुळे ६ जणांचा मृत्यू झाला, तर १०० हून अधिक लोक बेपत्ता आहेत.
त्या श्वानामध्ये झालं देवाचं दर्शन
म्यानमार मधील भूकंपाच्या विदारक दृश्यांना पाहून सारं जग सुन्न झालं आहे. मृत्यूनेही आक्रोश करावा अशी दृश्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.ह्या व्हिडिओ मध्ये एका लहान मुलाला मातीच्या ढिगाऱ्यातून एक कुत्रा बाहेर काढत आहे. निसर्गाने एवढी विचित्र खेळी खेळली आहे की ह्या तंत्रज्ञानाच्या जगातही एखाद नैसर्गिक संकट आलं तर मदतीला माणसाचे हात कमी पडताना दिसत आहेत.जिथे माणसातील माणूसपण नाहीस होत आहे तिथे एक कुत्र्याने मात्र सर्वांच मन जिंकल आहे. तो कुत्रा त्या लहान बालकाला आपल्या नखांची कोणतीही इजा न करता त्याला त्या ढिगाऱ्यातून बाहेर काढायचा अतोनात प्रयत्न करत आहे.
वडिलांच्या छत्राखाली मूल नेहमीच सुरक्षित असतं
म्यानमार मधील भूकंपाने अनेकांचे संसार उद्धवस्त झाले अनेक लहान मुलांनी हे सुंदर जग पाहण्या आधीच निसर्गाचा भयावह चेहरा पाहिला.कित्तेक लहान मूल, प्राणी, पक्षी, माणसं ह्या ठिगऱ्यांमध्ये अडकली आहेत.अजूनही बचावकार्य सुरू आहे. कित्येकजण मदतीच्या प्रतिक्षेत आहेत.असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.यात एक बाप आपल्या लहान मुलाला वाचविण्याच्या धडपडीत मृत पावला आहे.एकदम हृदयद्रावक. म्यानमारच्या विनाशकारी भूकंपानंतर ढिगाऱ्याखाली आपल्या मुलाचे संरक्षण करताना एका बापाचा मृत्यू झाला. मदत दुर्मिळ आहे. ही मानवी किंमत आहे.













