केवळ दोनच व्यक्ती वाचल्या;पहा थरारक व्हिडिओ
मुंबई: दक्षिण कोरियाच्या मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी 181 जणांना घेऊन जाणारे जेजू एअर लाइन्सचं विमान कोसळून आग लागली. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या अपघातात विमानातील केवळ दोनच व्यक्ती वाचल्या आहेत.इतर सर्वांचा या अपघातात होरपळून मृत्यू झाला आहे.दक्षिण कोरियाच्या इतिहासातील हा सर्वात प्राणघातक विमान अपघातांपैकी एक अपघात मानला जात आहे.थायलंडमधील बँकॉक येथून निघालेले बोईंग 737-800 जेट हे विमान धावपट्टीवरून घसरले. विमानाचं लँडींग करत असताना लँडिंग गियर उघडले नसल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

स्थानिक वेळेनुसार सकाळी 9 वाजून 7 मिनिटांनी हे विमान मुआन विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न करत होतं. विमान धावपट्टीवर उतरलं असतानाही विमानाचे लँडिंग गिअर उघडले नाहीत. त्यामुळे विमानावरील पायलटचं नियंत्रण हरवून हा अपघात झाल्याचं सांगितलं जातंय.
हे विमान एका काँक्रीटच्या भिंतीला धडकून आगीचा भडका उडालाया अपघातात केवळ दोघे वाचल्याची माहिती असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. जे दोघे वाचले आहेत, त्यात एक प्रवासी आणि एक क्रू मेंबर आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत एकूण 85 जणांचा मृत्यू झाल्याचं कन्फर्म करण्यात आलं आहे. यात 46 महिला आणि 39 पुरुष असल्याची माहिती दिली आहे. तर अद्याप बेपत्ता झालेल्यांचे मृतदेह शोधून बाहेर काढण्याचं काम बचाव दलाकडून केलं जात आहे.


Subscribe


