अहो रावण जाळून नव्हे तर समाजातील विकृत दुशासनांना शासन मिळेल तेव्हा…..!

शब्दांकन / सायली राजन सामंत, कुडाळ

खूप दिवस विचार करत होते या विषयावर लिहायचे की नाही पण गेला आठवडाभर ज्या बातम्या प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा विविध माध्यमातून बलात्कार आणि लैंगिक शोषणा बद्दल समोर आल्या आणि मन मात्र हेलावून गेले.कोलकाता मध्ये बलात्कार, कोल्हापूर मध्ये बलात्कार, मुंबई बदलापूर मध्ये बलात्कार.., तसेच देशाच्या विविध भागात बलात्कार रोज नुसते बलात्कार बलात्कार आणि बलात्कारच. या वासनेच्या अधीन गेलेल्या समाजातील काही विकृत राक्षसांपासून आपला शिव छत्रपतींचा महाराष्ट्र सुद्धा सुटलेला नाही.झालेल्या घटना समोर आल्यावर एकच तगादा समाजाकडून लावला जातो we want justice. एवढं बोलून न्याय लगेच मिळेल का हो? नुसत्या मेणबत्या पेटवून बलात्कार थांबतील का? महाराष्ट्र बंद ठेऊन मुलींना संरक्षण मिळेल का? रस्त्यावरून रॅली काढून समाजातील काही वासनेच्या अधीन गेलेल्या विकृत अशा पुरुषांन मधील बलात्कारी वृत्ती जाईल का? माझे स्पष्ट मत आहे की मुळीच नाही.अशा गोष्टींमुळे आंदोलनात सहभागी झालेल्यांना काही दिवसांपूर्ती प्रसिद्ध मिळू शकते पण ज्यांच्यावर हा प्रसंग उद्धभवला आहे त्यांना मात्र न्याय कधीच मिळू शकत नाही. आणि न्याय मिळालाच तर त्यांच्या उध्वस्त झालेल्या जीवनाची भरपाई कधीच होऊ शकणार नाही हे मात्र निश्चित.

आपल्या न्याय व्यवस्थेत थोडासा बदल करून शिवकालीन न्याय निती सध्याच्या घडीला लवकरात लवकर सरकारने अंमलात आणन गरजेचं आहे. कारण शिवाजी महाराजांच्या कालखंडात असं निच कृत्य करणाऱ्या नराधमांना जनतेच्या डोळ्यादेखत भर चौकात सुळावर चढवलं जायच, कडेलोट केले जायचे, फाशी दिली जायची त्यामुळेच काय कोणाची हिंम्मत स्त्री वर्गाकडे वाकड्या नजरेने पहाण्याची. परस्त्री मातेसमान मानणारा तो कालखंड.म्हणून त्या कालखंडाच वर्णन यथा राजा तथा प्रजा असंच करावं लागेल. सध्याच्या घडीला जनते मध्ये तो धाक मुळीच राहिलेला नाही आजच्या वास्तवाच वर्णन करायच झालं तर लहरी राजा प्रजा आंधळी त्यामुळेच दरबार अधांतरी झाला आहे हे वास्तव संपूर्ण भारत देशात पहायला मिळतंय हे मात्र निश्चित.

जिन्हें स्त्री मे सखी दिखाई दि वो द्रौपदी के गोविंद हुए, जिन्हें स्त्री मे अर्धांगिनी दिखाई दि वो सीता मैय्या के श्रीराम हुए, जिन्हें संस्कारोंकी और राजनीती की झाकी दिखाई दि वो जिजाई के शिवबा बन गये. ये बात कल भी सच थी और आज भी सच है और भविष्यकाल मे भी सची ही रहेगी….

शेकडो वर्षांचा मंगलमय इतिहास लाभलेला आपला संपूर्ण भारत देश राणा प्रताप, झाशीची राणी, शिवाजी महाराज असे शासन कर्ते पौराणिक कथा साराच्या सखोल अभ्यासातून घडले.त्या काळात या सर्वांनी लंकाधीश रावणाचा पुतळा करून भर चौकात कधीच जाळला नाही कारण त्यांना माहिती होत रावणाने सीतेच हरण केल पण सीतेच्या पल्लवाला त्याने मात्र कधीच हात घातला नव्हता. त्यामुळेच रावणा ऐवजी द्रौपदीच्या पल्लवाला हात घालणाऱ्या समाजातील वासनेने बरबटलेल्या विकृत नराधम दु:शासनांना मात्र त्यांनी जनते समोर गाढवावरून धिंड काढत भर चौकात शासन केल.त्यामुळेच समाजात दहशत निर्माण झाली. त्यामुळेच सुसंस्कृतपणे जनता आचरण करू लागली.सध्याच्या घडीला आपला भारत देश प्रत्येक क्षेत्रात प्रगतशील बनतो आहे,भारत देशाची एक नागरिक म्हणून मला त्याबद्दल प्रचंड आदर आहे. पण आपल्या देशातील मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने मात्र माझं मन तेवढंस समाधानी नाही. कालपर्यंत मी एक मुलगी म्हणून मुलींच्या रहणीमाना बद्दल मला खूप राग यायचा की मुली फॉरवर्ड रहातात, हा वास्तव नाकारून चालणार नाही त्याबद्दल राग येण साहजिकच आहे. त्यासाठी तारुण्याच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या मुलींच्या आईवडिलांनी क्षणाक्षणाला सतर्क रहाणं काळाची गरज आहे हे मात्र निश्चित.मुलींनी फॉरवर्ड नक्कीच रहायला पाहिजे पण ते आपल्या संस्कृतीला धरून राहील पाहिजे.ही नाण्याची एक बाजू झाली पण अहो नाण्याची दुसरी बाजू पडताळून पहिली की मन हादरून जात .अहो पहिली दुसरीच्या मुलीनंवरती वडिलांच्या वयाच्या विकृत व्यक्तींकडून दिवसा ढवळ्या बलात्कार होतोय, अहो पुराण काळातील दानव परवडले पण या विकृत मानवांच करायचा तरी काय? असं प्रश्नचिन्ह समोर उभ राहील आहे.बिचाऱ्या शोशीत चिमुरड्या मुलींचा त्यात काय अपराध? मुलगी म्हणून जन्माला आलोय याबद्दल त्यांनी अपराध बाळगायचा का?त्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश ऐकला की भल्या भल्यांच मन हादरून जात.आपल्या भारत देशाचं मैत्री राष्ट्र असोत किंवा शत्रू राष्ट्र असोत त्यांच्याकडे या अक्षम्य अपराधाला मृत्यू दंडाच्या आणि फाशीच्या शिक्षा त्यांच्या शासनाकडून लगेच दिल्या जातात मग सांगा आपला संपूर्ण भारत देशच या बाबतीत का मागे रहातोय?सध्याच्या राज्य कर्त्यांनी त्याच सिहांवलोकन करणं अत्यंत गरजेचं आहे.ते सिहांवलोकन करण्याची मती राज्यकर्त्यांना परमेश्वराने द्यावी अशी ईश्वरचरणी मी एक भारतीय नागरिक म्हणून प्रार्थना करते.सध्याच्या घडीला प्रसंगाच चक्रव्यूह भेदायचं असेल तर मुलगी असो किंवा मुलगा असो शिक्षणाबरोबरच त्यांना संस्कार देण ही पालकांची जबाबदारी आहे.पण जनतेवर नियंत्रण ठेवण आणि समाजातील विकृत घटकांना शासन करणं ही राज्य कर्त्यांची जबाबदारी आहे. आजचे राज्यकर्ते त्यामध्येच कमी पडतायत. आणि म्हणूनच सध्याची शोकांतिका ही आहे की आपल्या भारत देशाच्या लोकशाहीत कार्यरत असलेले सर्व लोक प्रतिनिधी आपल्या स्वार्थासाठी सत्तेची संगीत खुर्ची खेळताना दिसतात. राजेशाहीच्या कालखंडातील राज्यकर्ते निःस्वार्थ वृतीने करीत होते देश सेवा पण आजच्या लोकशाहितील प्रत्येक नेता बघतोय स्वतःला खायला मिळतोय का मेवा….. खोटं बोलणारा होतोय मंत्री किंमत नाही सत्याला…. हा वास्तव मुळीच नाकारून चालणार नाही. आजच्या घडीला राज्यकर्त्यांमध्ये कृष्ण निती संचारेल त्याच वेळी परस्त्रीच्या पल्लवाला हात घालणाऱ्या दु:शासनांना खरं शासन होईल, आणि त्याचमुळे समाजात वावरत असणाऱ्या प्रत्येक स्त्री घटकाला खऱ्या संरक्षणाच्या साड्या पुरवल्या जातील.आणि खऱ्या अर्थाने स्त्रीच्या अब्रूच रक्षण होईल. आणि मग पहा माझा भारत देश महान…असे मुखोदगार भारत भरातून ऐकायला येतील पण त्याकरिता रावणा ऐवजी समाजातील दुःशासनांची विकृती जाळून खाक करणं काळाची खरी गरज आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *