श्री देव महापुरुष लिंगदेवता भजन मंडळ पिंगुळी भूपकरवाडी यांचे आयोजन
कुडाळ : शुक्रवार दिनांक ४ एप्रिल २०२५ रोजी रात्रौ ठीक ८.३० वाजता श्री देव महापुरुष लिंगदेवता भजन मंडळ पिंगुळी भूपकरवाडी आयोजित पार्सेकर दशावतार नाट्यमंडळ, वेंगुर्ला, उभादांडा यांचा दंभ गरुडाक्ष फणेन्द्र भक्ष हा महान पौराणिक दशावतार नाट्यप्रयोग सादर होणार आहे.
श्री देव महापुरुष लिंगदेवता भजन मंडळ पिंगुळी, भूपकरवाडी नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. यावेळी देखील त्यांनी नाट्यरसिकांसाठी महान दणदणीत नाट्यप्रयोग आयोजन केले आहे. तेव्हा सर्व नाट्यरसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या दशावतार नाटकाचा आनंद घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
स्थळ : पिंगुळी भूपकरवाडी, कौल कारखाना नजिक