कुडाळ : हुमरमळा वालावल गावातील उपकेंद्रातील कर्मचारी सतत जनतेच्या आरोग्याची काळजी घेणारे उपक्रम घेत असतात असे गौरवोद्गार माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांनी काढले.
वालावल आरोग्य केंद्रांतर्गत हुमरमळा वालावल उपकेंद्रात इसीजी व रक्त तपासणी मोफत शिबिराचे उद्घाटन श्री बंगे यांच्या हस्ते झाले. यावेळी रुग्ण कल्याण समिती सदस्य मा सरपंच सौ अर्चना बंगे, वालावल प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ सचिन जंगम, समुदाय आरोग्य अधिकारी श्रध्दा परब उपस्थित होते.
यावेळी श्री बंगे बोलताना म्हणाले या आरोग्य उपकेंद्रातील कर्मचारी अगदी सतत लोकांची आरोग्याची काळजी घेत असतात. यासाठी वालावल प्राथमिक आरोग्य केंद्राचे कायमच सहकार्य लाभते. असे सांगून श्री बंगे म्हणाले, आपल्या गावासाठी माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नाने एवढी मोठी भव्य दिव्य इमारत बांधुन मिळाली कायमच लोकांची सेवा इथे केली जाते. त्या आज जसे मोफत शिबीर घेऊन लोकांचा प्रतिसाद मिळाला त्याचे सर्व श्रेय हे ह्या उपकेंद्रातील कर्मचारी वर्गाचे जाते. असे सांगुन आजची या शिबिराला उपस्थिती पाहुन समाधान वाटले असेही नांगे यांनी सांगितले.
यावेळी आरोग्य सेविका सौ. एल. जी. चव्हाण ह्या 21 मार्चला सेवानिवृत्त होत आहेत म्हणून त्यांचा सत्कार श्री बंगे यांच्या हस्ते करण्यात आला.













