सावंतवाडीत एका बँकेत सहा लाखाचा आर्थिक घोटाळा

मृत असलेल्या खातेदाराच्या नावे असलेले एफडीचे पैसे केले लंपास

संचयिताला अटक व पोलीस कोठडी

सावंतवाडी : शहरातील एका राष्ट्रीयकृत बँकेत सहा लाख रुपयांचा आर्थिक अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला कर्मचारी संशयित याला अटक करुन येथील न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली.

यातील संशयित हा बँकेचा कर्मचारी असून कर्तव्य बजावत असताना आपल्या अधिकाराचा गैरवापर करुन मृत असलेल्या खातेदाराच्या नावे असलेले एफडीचे पैसे आपल्या पत्नी व आईच्या नावाने खाते काढुन त्यात वर्ग केले होते. ही रक्कम सव्वा सहा लाख इतकी होती. दरम्यान हा प्रकार लक्षात आल्यानंतर बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याच्या विरोधात सावंतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती त्यावरुन त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल कराण्यात आला होता. दरम्यान गुरुवारी पोलिसांनी त्याला अटक करुन येथील न्यायालयात हजर केले असता १ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

error: Content is protected !!