सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यात शिवसेनेचेजिल्हा संघटक संजू परब यांच्या माध्यमातून उबाठा गटाला पुन्हा एकदा सुरुंग लावण्यात आला असून उबाठा गटाचे पदाधिकारी सुदन कवठणकर यांच्या नेतृत्वाखाली माजी सरपंच सुमन सुदन कवठणकर, ग्रामपंचायत सदस्या विजया कवठणकर, किनळे ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश नाईक, श्रद्धा कामटेकर यांच्यासह आरोंदा विभागातील ३०० हून अधिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार निलेश राणे व आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी आमदार निलेश राणे यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत करत तुमचा शिवसेनेत योग्य सन्मान राखला जाईल अशी ग्वाही दिली.
आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस सावंतवाडी येथील मँगो हॉटेलच्या सभागृहात संजू परब मित्र मंडळ व सह्याद्री फाउंडेशनच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमानंतर संजू परब यांच्या माध्यमातून व सुदन कवठणकर यांच्या नेतृत्वात उबाठा गटातील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.