ब्युरो न्यूज: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरलेल्या अंगणवाडी सेविकांसह इतरांना प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी पुणे जिल्ह्यातील १ कोटी ९२ लाख २५ हजार ६०० रुपये जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत.पैसे आले असले तरी, एका विभागाकडून दुसऱ्या विभागाकडे हस्तांतरित करून ते प्रत्यक्षात अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर पैसे जमा करण्यास एका आठवड्याचा कालावधी गेला आहे. पुढील काही दिवसांमध्ये अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर एका अर्जासाठी पन्नास रुपयांप्रमाणे पैसे वर्ग करण्यात येणार आहेत.