मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची प्रतिक्रिया
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी शेवटचा पर्याय म्हणून सन्माननीय राज साहेबांच्या शिवतीर्थावर जाऊन मदत मागताना वेळ काळ बघितला नाही.बरं अडचणीच्या काळात राज साहेबांनी कसलाही विचार न करता निस्वार्थीपणे राणेंसाठी सभा घेतली. मा.प्रबोधनकार ठाकरे,मा.श्रीकांत ठाकरे आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे चालणाऱ्या राज ठाकरेंना नितेश राणे आपण हिंदूत्व शिकवू नये. आपला इतिहास आपलं हिंदूत्व आपण कॉग्रेसमध्ये असतांना महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलच आहे. तुम्ही तुमचं मंत्रीपद टिकवण्यासाठी राज साहेबांवर टिका करण्यापेक्षा मिळालेल्या मंत्रिपदाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तसेच सिंधुदुर्गातील जनतेसाठी काहीतरी चांगलं करण्याचे प्रयत्न करावेत. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांना काम धंद्यासाठी परराज्यावर किव्हा पुणे मुंबई वर अवलंबून रहावे लागते त्यामुळे पर्यावरण पूरक उद्योग धंदे आणून जिल्ह्यातील तरुणांचं भलं करावं. अशी टीका आपल्या प्रसिद्धी पत्रकातून मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केली आहे.













