ब्युरो न्यूज: एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांच्या कार्यकाळात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी अनेक योजना सुरु करण्यात आल्या होत्या. ज्यामध्ये सणासुदीच्या वेळी आनंदाचा शिधा, ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थाटन योजना आणि 10 रुपयांमध्ये शिवभोजन थाळी योजना.मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने निधी न दिल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळातील योजना बंद पडण्याची शक्यता आहे. या योजना केवळ आता कागदावरच उरल्या आहेत.एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात दसरा, दिवाळी, गणेशोत्सव, गुढीपाडवा आणि शिवजयंती अशा सणांसाठी आनंदाचा शिधा वाटप करण्यात येत होते. या योजनेवर सुमारे 602 कोटी रुपये खर्च करण्यात येत होते. मात्र, आता गुढीपाडवा आला तरी आनंदाचा शिधा योजनेसाठी निधीचा निर्णय घेण्यात आला नाही. अर्थमंत्र्यांच्या भाषणामध्ये आणि तरतुदींमध्ये याचा उल्लेख नाही.त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी सुरु केलेली 10 रुपयांमध्ये शिवभोजन थाळी ही योजना एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांच्या कार्यकाळात सुरु ठेवली होती. मात्र, आता या योजनेसाठी देखील निधीची तरतूद करण्यात आलेली नाही. तसेच एकनाथ शिंदे यांनी सुरु केलेली ज्येष्ठ नागरिकांना तीर्थाटनाची योजनेचा देखील बंद होणार असल्याचं म्हटलं जात आहे. निधीमध्ये अर्थमंत्र्यांनी या योजनेचा उल्लेख केलेला नाही.

आनंदाचा शिधा होणार बंद?
1
/
103
शाळेत भरला गावठी बाजार; विद्यार्थ्याने आणली कोंबडी! #sindhudurg
पोलिसांनी मार खावा का ? अभिजीत दीपकेंना आ. निलेश राणेंकडून प्रत्युत्तर #nileshrane
चक्क ८२ वर्षांच्या आजीने घेतला धबधब्यात पोहण्याचा आनंद #sindhudurg
आंबोली मान्सून मॅरेथॉन २०२६ ला उत्साहात सुरुवात #marethone
सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल रुग्णांवर डिस्चार्ज व बांबुळी रेफरसाठी दबाव #sindhudurg
सताधाऱ्यांच्या फसव्या घोषणाना जनता बळी पडणार नाही #sindhudurg
१५ ऑगस्टपर्यंत मासेमारीवर बंदी - नितेश राणे | Nilesh Rane #niteshrane
उद्धव साहेबांनी बाळासाहेबांचे विचार सोडले
आमची सगळी टीम सकारात्मकतेने काम करतेय - निलेश राणे |Nilesh Rane #nileshrane
महाराष्ट्र सरकारचा मच्छीमारांच्या भविष्यासाठी ऐतिहासिक निर्णय #niteshrane
खोल समुद्रातील मच्छिमारांसाठी सॅटेलाईट फोन सुविधा #niteshrane
पंतप्रधानांना देशाच्या भविष्याची सर्वात जास्त काळजी - पालकमंत्री नितेश राणे #niteshrane
1
/
103

Subscribe










