निलमताई राणे करणार मार्गदर्शन
देवगड प्रतिनिधी: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार प्रचार सभा होत आहेत. कुडाळ मालवण मतदार संघाचे शिवसेनेचे उमेदवार निलेश राणे यांच्या साठी खासदार नारायण राणे यांनी प्रचार सभा आयोजित केल्या असतानाच आता निलमताई राणे यांनी देखील कणकवली-देवगड- वैभववाडी विधानसभा मतदार संघातील भाजपा महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारासाठी देवगड येथे भव्य महिला सभा आयोजित केली आहे.
केव्हा होणार सभा?
भाजपा देवगड मंडळाच्या वतीने दिनांक ११ नोव्हेंबर २०२४ रोजी भव्य महिला सभा आयोजित करण्यात आली आहे.कार्यक्रम तारी कंपाऊंड, हॉटेल प्रपंच शेजारी, देवगड येथे सायंकाळी ५ वाजता होणार आहे.या सभेसाठी जिजाऊ महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. निलमताई राणे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
निलेश राणे यांचा विजय ऐतिहासिक असेल: काका कुडाळकर
तसेच, भाजपा प्रवासी प्रभारी महिला मोर्चा संयोजिका श्रीमती सुलक्षणा प्रमोद सावंत आणि भाजपा महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर या प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.महिला मोर्चा तालुकाध्यक्षा सौ. उषःकला केळुस्कर यांनी देवगड तालुक्यातील भाजपा महिला मोर्चा पदाधिकारी, महिला आजी- माजी लोकप्रतिनिधी, तसेच महिला बूथ अध्यक्षांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.