ब्युरो न्युज: ।महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. यातच कुडाळ मालवण मतदार संघाचे उबठा चे वैभव नाईक यांच्या विरोधात भाजपा महायुतीचे उमेदवार निलेश राणे उभे आहेत. दरम्यान दोन्ही पक्षांचा जोरदार प्रचार सुरू आहे.एकमेकांवर टीका प्रती टीकांचे घमासान चालू असतानाच आता वैभव नाईक यांनी केलेलं एक ट्विट राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.
काय आहे ट्विट?
वैभव विकल्प यांनी ट्विट करत नारायण राणे यांना विरोध केला आहे. या ट्विट मधे वैभव नाईक म्हणाले आहेत की, “उद्धव साहेबांच्या गाडीच्या पुढे माझी गाडी असणार आहे. इतका निरोप नारायण राणे यांना कळवा.