नेरूर तर्फ हवेली येथे मृतावस्थेत आढळला बिबट्या

कुडाळ : गुरुवार दिनांक 06.03.2025. रोजी परिमंडळ नेरुर तर्फ हवेली कडील नियतक्षेत्र नेरुर कविलगाव येथील रहिवासी श्री. सुर्यकांत भिकाजी कुंभार यांनी वनपाल नेरुर यांना भ्रमणध्वनीवर करून मृत बिबट्या दिसल्याची खबर दिली. या खबरीच्या अनुषंगाने वनपाल नेरुर त. हवेली यांनी सदर घटनेबाबतची माहिती वनक्षेत्रपाल कुडाळ यांना दिली. त्याप्रमाणे मा. सहा. वनसंरक्षक (खाकुतो व वन्यजीव) सावंतवाडी व वनक्षेत्रपाल कुडाळ यांनी वनपाल नेरुर त. हवेली व वनरक्षक नेरुर त. हवेली यांचे समवेत जागेवर जाऊन पाहाणी केली असता, वन्यप्राणी बिबट मृत झाल्याचे दिसून आले. त्यानंतर पशुवैदयकिय अधिकारी कुडाळ यांना बोलाविणेत आले. पशुवैदयकिय अधिकारी कुडाळ यांनी सदर मृत बिबट्याचे पाहाणी केली असता, सदर बिबट हा मादी असून त्याचे अंदाजे वय 4 ते 5 वर्षे असल्याचे सांगितले. सदर ठिकाणी आजु बाजूच्या परिसराची पाहाणी करुन व चौकशी करुन, खात्री करुन पंचनामादी कागदपत्रे तयार केली आहेत. त्या नंतर मृत बिबट्याचे शव मौजे आकेरी येथील वनविश्रामगृह येथे आणून त्याचे पशुवैदयकिय अधिकारी कुडाळ यांचे मार्फत मा. उप-वनसंरक्षक सावंतवाडी, मा. सहा. वनसंरक्षक (खाकुतो व वन्यजीव) सावंतवाडी व वन अधिकारी/कमर्चारी यांचे समक्ष शवविच्छेदन करुन दहन करणेत आले. शवविच्छेदन करताना मृत्युचे नेमके कारण समजणे करिता सदर मृत बिबट मादीच्या अवयवांचे नमुने घेण्यात आलेले आहेत ते, न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेत तपासणी करिता पाठविण्यात येणार असून, सदर घटनेबाबत वनपाल नेरुर त. हवेली यांचेकडील प्रथम गुन्हा रिपोर्ट वप्रार 02/2025 चा गुन्हा दाखल केला आहे.

सदर घटनेचा पुढील तपास मा. उप-वनसंरक्षक सावंतवाडी व मा. सहा. वनसंरक्षक (खाकुतो व वन्यजीव) सावंतवाडी यांचे मार्गदर्शनाखाली चालू आहे. (सं. श्री. कुंभार) वनक्षेत्रपाल कुडाळ तपासणी अधिकारी यांनी माहिती दिली.

error: Content is protected !!