कुडाळ : महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ श्री. देव वेतोबा मंदिर वेताळ बांबर्डे येथे श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी निलेश राणे यांना बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार सर्वांनी केला.
यावेळी शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिरवलकर, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, मंडल सरचिटणीस देवेंद्र सामंत, कामगार सेना जिल्हाप्रमुख प्रसाद गावडे, शिवसेना तालुकाप्रमुख बंटी तुळसकर, वेताळ बांबर्डे ग्रामपंचायत सदस्य दशरथ कदम, सजूराम नाईक, अवधूत सामंत, रांगणातुळसुली माजी सरपंच नागेश आईर, माजी पंचायत समिती सदस्य मोहन सावंत, माजी पंचायत समिती सदस्य आनंद भोगले, शक्ती केंद्र प्रमुख भास्कर गावडे, सुनील गायकवाड, निलेश बांबर्डेकर, अरविंद बांबर्डेकर, माजी सरपंच संध्या मैस्त्री, रोहिणी चव्हाण आदी उपस्थित होते.