कुडाळ : पणदूर संविता आश्रम येथील सौ. विद्या देविदास कुडणेकर (४८) ही महिला आश्रमातून बेपत्ता झाली आहे. ही घटना ४ जून रोजी पहाटेघडली. या घटनेची फिर्याद संविता आश्रम पणदूरचे उपव्यवस्थापक आशिष कांबळी यांनी कुडाळ पोलिसात दिली आहे. सौ. विद्या ही २४ जानेवारी २०२४ रोजी संविता आश्रम येथे दाखल झाली होती. ४ जून रोजी सकाळी ७.१५ वा. सौ. विद्या हिला श्री. कांबळी हे उठवण्यासाठी गेले. यावेळी ती बेडवर आढळली नाही. तिचा आजुबाजुला शोध घेऊनही ती आढळली नाही. यानंतर तिच्या गोवा येथील पतीला याबाबत विचारले असता तेथेही तिची माहिती मिळाली नाही. या घटनेची माहिती आश्रमाचे व्यवस्थापक संदीप परब यांना माहिती दिली. सौ. विद्या ही मानसिक रूग्ण असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. ती यापूर्वीही दोनवेळा आश्रमातून निघून जाऊन परत आली होती, असे फिर्यादीत नमूद केले आहे.