– पालकमंत्री नितेश राणे
सिंधुदुर्गनगरी : पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना आंबिया बहार सन २०२४-२५ अंतर्गत कृषी विभागाकडून सातत्याने पत्रव्यवहार करून देखील भारतीय कृषी विमा कंपनीने नुकसान भरपाईचा तपशील तसेच क्षेत्रीय तपासणीचा सविस्तर तपशील उपलब्ध करून दिलेला नाही. त्यामुळे भारतीय कृषी विमा कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्याची तसेच काळ्या यादीत (Black List) टाकण्याची शिफारस कृषी आयुक्तालयास करण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. पत्रव्यवहार करून देखील राज्यस्तरीय विमा प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहिले नसल्याने पालकमंत्री नितेश राणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच सन २०२५-२६ करिता सदरच्या विमा कंपनी ऐवजी इतर विमा कंपनीची नियुक्ती करावी असे देखील पालकमंत्र्यांनी निर्देशित केले.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित विमा कंपनीचे राज्यस्तरीय प्रतिनिधी, स्कायमेट वेदर कंपनीचे प्रतिनिधी व कृषी विभाग यांची एकत्रित बैठक जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांची दालनामध्ये आयोजित केली होती. यावेळी यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक ऋषिकेश गावडे , स्कायमेंट कंपनीचे प्रतिनिधी व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
1
/
73
जेव्हा रवींद्र चव्हाण येतात जिल्ह्याचा माहोल खराब करतात – निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane
FIR नोंदवण्यासाठी जे काही करावं लागेल ते आम्ही करणार – निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane
रोख रक्कम सापडलेल्या केनवडेकर यांच्या घरी पालकमंत्री नितेश राणे यांनी केली पाहणी
स्वतःच्या व्यवसायासाठी घरात पैसे ठेवले तर त्यात चूक काय ? - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
जनतेने पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास दाखवावा - राजन गिरप #vengurla
भाजपचा निलेश राणेंना इशारा
निवडणुकांमध्ये पैशांचे वाटप होणं चुकीचं आहे दीपक केसरकर| Deepak kesarkar #deepakkesarkar
दीपक भाईंवर टीका करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे - निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane
निलेश राणेंनी टाकलेल्या धाडीवर माजी आमदार वैभव नाईक यांची प्रतिक्रिया | Vaibhav Naik #vaibhavnaik
भाजपचे कार्यकर्ते विजय केनवडेकर यांच्या घरी २० ते २५ लाखांची रोख रक्कम सापडली - निलेश राणे
आमदार निलेश राणेंनी भाजप पदाधिकाऱ्याला पैसे घरी घेऊन जाताना रंगेहाथ पकडले | Nilesh Rane
वेंगुर्ल्याची जनता शिवसेनेच्या पाठीशी - सचिन वालावलकर #vengurla #sindhudurg
1
/
73


Subscribe










