कुडाळचे नगरसेवक अभिषेक गावडे यांनी सिंधुदुर्ग राजा चरणी 1001 नारळ अर्पण करून नवस फेडला.

निलेश राणे आमदार व्हावे म्हणून केला होता नवस

कुडाळ : कुडाळ नगरपंचायत नगरसेवक तथा शिवसेना शहर प्रमुख अभिषेक गावडे यांच्या वतीने एक वर्षापूर्वी कुडाळ मालवणचे आमदार निलेशजी राणे साहेब आमदार व्हावे म्हणून सिंधुदुर्ग राजा चरणी नवस बोलण्यात आला होता.

काल रविवारी शिवसेना जिल्हा प्रमुख मा श्री दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग राजा चरणी 1001 नारळ अर्पण करून नवस फेडण्यात आला. त्यावेळी जिल्हा प्रमुख दत्ता सामंत, माजी जि. प अध्यक्ष संजय पडते,जिल्हा सचिव दादा साईल, महिला जिल्हा प्रमुख सौ दीपलक्ष्मी पडते,कुडाळ नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर आदी पदाधिकारी शिवसैनिक व सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठान पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!