आ. निलेश राणे यांची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनधिकृत रित्या वास्तव्यास असलेल्या परप्रांतीय व्यक्तींची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आमदार निलेश राणे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात असे म्हटले आहे की, काही परप्रांतीय व्यक्ती सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनधिकृतपणे वास्तव्य करून येथे व्यवसायाच्या नावाखाली अनेक गैरप्रकार करत आहेत. यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या मुस्लिम समाजातील व्यक्तींची संख्या जास्त आहे. अश्या लोकांजवळ कुठलेही वास्तव्याचे पुरावे नाहीत, बनावट आधारकार्ड व इतर तत्सम कागदपत्रे बनवून तसेच अत्यंत जुन्या व नोंदणी नसलेल्या गाड्यांचा वापर या लोकांकडून होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अश्या लोकांचा वावर हा जिल्हाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे.
तरी सदरील परप्रांतीय लोकांच्या कागदपत्रांची त्वरित चौकशी करून अनधिकृत असलेल्या लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रतिबंधित करण्याची कार्यवाही करावी. या लोकांनी वास्तव्याची कागदपत्रे उदा. आधार कार्ड, रेशनकार्ड कोणत्या कागदपत्रांच्या आधारे बनवली याची शहानिशा करून चौकशी व्हावी. तसेच त्यांच्या वापरातील गाड्यांचीही तपासणी करून त्या जप्त कराव्यात व अश्या व्यक्तींच्या राहत्या घरांची झाडाझडती घेत तात्काळ कारवाई करावी. अशी मागणी आ. निलेश राणे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.














