कुडाळ प्रतिनिधी
पावशी गावामध्ये गेली दहा वर्ष महामार्ग लगत सर्विस रस्त्याची मागणी माजी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्याकडे करून सुद्धा त्यांनी याकडे दुर्लक्ष केला मात्र माजी खासदार निलेश राणे यांच्याकडे ही मागणी केल्यावर आठ दिवसात हा प्रश्न निकाली काढला त्यामुळे आम्ही सर्वांनी भाजप पक्षात प्रवेश करण्याचे निश्चित केले असे पावशी सरपंच वैशाली पावसकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर सांगितले.पावशी येथे कुडाळ तालुका भाजप पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये भाजपचे खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या उपस्थितीत सरपंच वैशाली पावसकर यांच्यासह अनेक उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला यावेळी प्रवेशकर्ता सरपंच वैशाली पावसकर यांनी सांगितले की, पावशी गावामध्ये आम्ही गेले अनेक वर्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून काम करत आहोत या गावातून चौपदरीकरण महामार्ग झाला आहे या महामार्ग लगत ग्रामपंचायत कार्यालय ते लिंग मंदिर या परिसरामध्ये सर्विस रस्त्याची आवश्यकता होती याबाबत माजी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांना वारंवार सांगितले पण आम्हाला आश्वासना पलीकडे काही मिळालं नाही. अखेर आम्ही माजी खासदार निलेश राणे यांच्या निदर्शनास हा प्रश्न आणला त्यांनी अवघ्या आठ दिवसात हा प्रश्न मार्गी लावला अधिकाऱ्यांची बैठक घेऊन हा प्रश्न सोडविला. कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या अशा नेतृत्वाच्या मागे उभे राहण्याचे आम्ही ठरवले त्यामुळे आम्ही सर्वांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. येत्या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना गावातून मोठे मताधिक्य देऊ असे सांगितले.