महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी मोठ्या मताधिक्याने विजयी करणार
सावंतवाडी : शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर,शिवसेना बांधकाम कामगार सेना जिल्हाप्रमुख प्रसाद गावडे,शिवसेना भजन संघटना जिल्हाप्रमुख रामचंद्र परब हे सावंतवाडी महायुतीचे उमेदवार दिपक केसरकर यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी उद्या शनिवार दि.०९ नोव्हेंबर २०२४ रोजी वेंगुर्ला सावंतवाडी दौऱ्यावर असणार आहेत. वेंगुर्ला तालुक्यातील रेडी,शिरोडा, केरवाडा तर सावंतवाडी मतदार संघातील मळेवाड,सावंतवाडी येथील ग्रामस्थ नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन कार्यकर्त्यांसमवेत चर्चा करून महायुतीचे उमेदवार दिपक केसरकर यांच्या सावंतवाडी विधानसभेत भगवा सतत तेवत फडकत ठेवण्यासाठी तसेच दिपक केसरकर यांची विजयी घौडदौड अशीच सुरू ठेवण्यासाठी आपण मतदार संघातून एक नंबरचे मताधिक्य मिळण्यासाठी आपण पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासमवेत गाठीभेटी घेऊन चर्चा करणार आहेत. यामुळे महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी यांना नवसंजीवनी देऊन जोमाने कार्य करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी आपण झोकून काम करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.