सिंधुदुर्ग : वैभवावाडी-कोल्हापूर मार्गावरील करुळ (गगनबावडा) हा घाट महत्वपूर्ण असून या घाटाकडे विकासाचा मार्ग म्हणून पाहिल्या जाते. करुळ घाट मार्गाचे काम हे दर्जेदार झाले आहे. हा घाट सुरू झाल्यास कोकणाच्या विकासाला चालना मिळणार असल्याने सोमवार (दि २४) पासून वैभववाडी ते कोल्हापूर अशी एकेरी वाहतूक पुढील पंधरा दिवसांसाठी प्रायोगिक तत्वावर सुरू करणार असल्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात रस्ते सुरक्षा संदर्भात आढावा बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे तसेच राष्ट्रीय महामार्ग अधिकारी उपस्थित होते.
गुणवत्ता आणि सुरक्षा मानकांना (Safety Norms) प्राधान्य देत या घाटाचे काम पूर्ण झालेले आहे. दरीकडील संरक्षक भिंतीचे काम तसेच घाटाच्या दुरूस्तीचे काम युद्ध पातळीवर पूर्ण करण्यात आले आहे. हे काम करताना प्रवासी सुरक्षितेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केलेली नाही. या घाटातून पहिल्या टप्प्यात वैभववाडी ते कोल्हापूर अशी एकेरी वाहतूक सुरू राहणार आहे. दुतर्फा वाहतूक सुरू करण्याबाबत १० मार्च नंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचेही श्री पाटील यांनी सांगितले.

सोमवार पासून करुळ घाटात एकेरी वाहतूक सुरू
1
/
95
कै. श्रीधरराव नाईक ३५ वा स्मृतिदिन
आम्ही हप्ते घेत होतो याचा एकतरी पुरावा संदेश पारकर यांनी दाखवावा - बंडू हर्णे यांचे आवाहन #kankavli
जेएसडब्ल्यूचा मायनिंग प्रकल्प सुरु करण्यासाठी जिल्हा प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा दबाव- वैभव नाईक
श्री. रवी कुडाळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
जिल्हाधिकाऱ्यांच्या 21 टेंडर च्या निर्णयावर बंडू हर्णे यांची पत्रकार परिषद #kankavli
योगेश मोबाईल शॉपीचा मान्सून धमाका #kudal #sindhudurg
कणकवली उड्डाण पुलाखालील फळ, फुले, भाजी मार्केट विक्रेत्यांची पर्यायी व्यवस्था करणार- संदेश पारकर
शिवसेना वाढीसाठी संघटनात्मक बांधणी करणार - सुशांत नाईक #kankavli #sushantnaik
एकाच घरात सत्ता गेल्याने सिंधुदुर्गात अवैध मायनींगचे संकट #vaibhavnaik #sindhudurg
"महाराज्या तुझ्या तलवारीन न्याय दि" मायनिंग विरोधात श्री. देव वेतोबाक ग्रामस्थांनी दिले गाऱ्हाणे
कणकवलीत १ कोटींच्या "श्री स्वयंभू नमो उद्यान"चे नगराध्यक्षांच्या हस्ते भूमिपूजन #kankavli
"स्मार्ट मीटरची जबरदस्ती खपवून घेणार नाही" - सुशांत नाईक #kankavli #sushantnaik
1
/
95

Subscribe










