वेंगुर्ले : वेंगुर्ले खर्डेकर महाविद्यालयामध्ये शिवजयंती निमित्त संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत न्यू इंग्लिश च्या आठवीतील विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केलं.
या स्पर्धेत संपन्न झालेल्या शालेय गटांसाठी भारताचे जाज्वल्य नेतृत्व सुभाष चंद्र बोस हा विषय देण्यात आला होता या विषयावर मंथन करताना इयत्ता न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा वेंगुर्ले विद्यालयाची विद्यार्थिनी कु.तनुष्का मुकुंद कुर्ले हिने उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक तर कु.वेदांती सत्यवान नवार हिने उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक पटकावत यश प्राप्त केले .
याच ठिकाणी संपन्न झालेल्या खुल्या गटात न्यू इंग्लिश स्कूल मधील इयत्ता आठवीची विद्यार्थिनी प्रज्ञा शिवानंद आरोंदेकर हिने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आणि त्याचे ऐतिहासिक महत्त्व या विषयावर भाष्य करत या खुल्या गटात तृतीय क्रमांक मिळवत यश प्राप्त केले
न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा विद्यालयाची यशाची पंरपरा कायम राखत विद्यालयाचा शिरापेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या या यशस्वी विद्यार्थिनींना या प्रशालेचे उपक्रमशिल अध्यापक प्रा.वैभव खानोलकर आणि लिपिक अजित केरकर यांनी विशेष मार्गदर्शन केले होते.
या विजेत्या स्पर्धकांचे विशेष अभिनंदन न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री विरेंद्र कामत -आडारकर
उपाध्यक्ष निवृत्त गटशिक्षणाधिकारी रमेश पिंगुळकर, सचिव रांगोळीकार रमेश नरसुले ,सदस्य निलेश मांजरेकर आणि इतर सर्व संस्था पदाधिकारी व विद्यालयाचे मुख्याध्यापक उमेश वाळवेकर तसेच विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शाळा व्यवस्थापन समिती, पालक संघ यांनी केले असुन या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सुप्रसिद्ध निवेदक तसेच मुलाखतकार, उपक्रमशील अध्यापक वैभव खानोलकर यांच्या सह लिपिक अजित केरकर व या यशस्वी विद्यार्थ्यांच्या पालकांचे ही विशेष अभिनंदन केले आहे.
सातत्याने विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत यश मिळवणाऱ्या न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा विद्यालयाचे या उल्लेखनीय यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे













