तालुका स्तरीय गणित ऑलिंपिक स्पर्धेत हरकुळ खुर्द गावडेवाडी शाळेने पटकावला प्रथम क्रमांक


कणकवली : अध्ययन संस्था मुंबई संचालित गणित सुधार उपक्रमांतर्गत गणित ऑलिंपिक स्पर्धेत आमच्या हरकुळ खुर्द गावडेवाडी शाळेतील इयत्ता सहावी सातवीच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवला. स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

पात्रता परीक्षेत कुशल तेली, पूर्वा तेली, भक्ती तेली, सानिका दळवी, सुरज थापा साहिल मोंडकर, पूजा परब, अनन्या रासम यांनी ९०% पेक्षा जास्त गुण मिळवून उत्कृष्ट कामगिरी करून शाळेला ट्रॉफी मिळवून दिली. कुशल तेली आणि पूर्वा तेली यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल शाळेला प्रथम क्रमांक प्राप्त झाला.त्याबद्दल शाळेत सर्व मुलांनी त्यांचे पुष्प वर्षावाने स्वागत केले. त्यांच्या या देदीप्यमान यशाबद्दल सर्वत्र अभिनंद होत आहे.श्री.राजन मर्गज सर , श्रीमती सुस्मिता सावंत मॅडम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.


शाळा व्यवस्थापन समिती, शाळा सुधार समिती, मुख्याध्यापक श्री.सुनील ठाकूर सर शिक्षक श्री.राजाराम भिसे सर , श्रीमती मानसी मेस्त्री मॅडम आणि ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

error: Content is protected !!