सावंतवाडी येथे युवकाची गळफास लावून आत्महत्या…

सावंतवाडी : ओटवणे-जाधववाडी येथील अक्षय गुंडू जाधव (वय २८) या युवकाने आपल्या घराच्या पडवीतच गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी साडे नऊच्या सुमारास उघडकीस आली. घरात कोणी नसताना त्याने हा प्रकार केला. त्यामुळे आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबतचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगी, वडील, भाऊ असा परिवार आहे.

error: Content is protected !!