एकनाथ शिंदे हुशार आणि धूर्त..योग्य वेळी योग्य निर्णय घेतील
किरण सामंत यांची प्रतिक्रिया
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात गेले कित्तेक दिवस चर्चा आहे ती राजन साळवी यांच्या शिवसेनेतील पक्ष प्रवेशाच्या वृत्ताची. राजन साळवी शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार का यावर अनेक तर्क वितर्क चालू असतानाच सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार राजन साळवी हे १० फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्ष करणार आहेत. मात्र साळवी यांच्या या पक्ष प्रवेशाच्या चर्चांवर आता मंत्री उदय सामंत यांचे थोरले बंधू यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साळवी यांच्या पक्ष प्रवेशाबाबत मंत्री उदय सामंत तसेच आपल्याला विश्वासात घेतली असं वक्तव्य किरण सामंत यांनी केलं आहे.
नेमकं काय म्हणाले किरण सामंत?
वैयक्तिक कामधंदासाठी आणि पदासाठी राजन साळवी यांची पक्षप्रवेशासाठी धडपड सुरू आहे. त्यांच्यासोबत आता कोणीही शिल्लक राहिलेले नाही. किंबहुना राजन साळवी हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात होते आणि आहेत, हे मी यापूर्वी ही सांगितले होते. पण राजन साळवी यांना एकनाथ शिंदे पटकन पक्षात घेतील, असं मला वाटत नाही. विधानपरिषद आणि महामंडळ देतील असं देखील मला तरी वाटत नसल्याची प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांचे थोरले बंधू किरण सामंत यांनी दिली आहे.
एकनाथ शिंदे हुशार आणि धूर्त
राजेश बेंडल सारखे उमेदवार आमच्या पक्षात आहेत. ते खूप थोड्या मतांनी गुहागरमधून पराभूत झाले आहेत. त्यामुळे त्यांना ताकद दिल्यास त्याचा फायदा होईल. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हुशार आणि धूर्त आहेत. ते योग्य वेळ योग्य निर्णय घेतील याची मला पूर्ण कल्पना असल्याचे ही किरण सामंत म्हणाले. निवडणूक हरल्यापासून राजन साळवी यांच्याबाबतीत पक्षांतराच्या चर्चा रंगताना दिसत आहेत. इतर पक्षातील त्यांची दारं बंद झाल्यामुळे ते अफवा उठवत असतील, अशी शंका ही किरण सामंत यांनी उपस्थित केली आहे.
तर राजन साळवी यांच्या पक्ष प्रवेशाबाबत मंत्री उदय सामंत यांना विचारले असता याबाबत राजन साळवी यांच्या प्रवेशबाबतीत मला माहिती नाही. एकनाथ शिंदे आणि माझ्यात त्याबाबत चर्चा नाही. त्यांना कदाचित त्यांच्या प्रवेशबाबतीत माहिती असेल, असेही सामंत म्हणाले.













