जि.प.पूर्ण प्राथ. शाळा रांगणा तुलसुळी नं.१ चा वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम व गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

जि.प.पूर्ण प्राथ. शाळा रांगणा तुलसुळी नं.१ चा वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम व गुणगौरव सोहळा अमृतमहोत्सवी प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला.
यावेळी जिल्हास्तरीय कॉम्प्युटर सायन्स हॅकेथॉन स्पर्धेत जि.प. पूर्ण प्राथ. शाळा रांगणा तूळसुली नं.१ चे शिक्षक राजेश ठाकूर आणि विद्यार्थी आर्यन भोसले,भक्ती गावडे,नारायण वारंग यांनी घवघवीत यश संपादन केल्याने कुडाळचे गटशिक्षणाधिकारी
संदेश किंजवडेकर यांचे हस्ते, सरपंच नूतनजी आईर उपसरपंच नागेश आईर केंद्रप्रमुख राजनजी वारंग यांचे प्रमुख उपस्थितीत सन्मान करण्यात आला.

जि.प शाळेच्या विद्यार्थ्यांनी कोडिंगचा वापर करून बनवले ॲप, गेम आणि ऍनिमेशन

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग व शिक्षण विभाग जि.प. सिंधुदुर्ग , अमेझॉन फ्युचर इंजिनिअर, लीडरशीप फॉर इक्विटी आणि कोड टु एनहान्स लर्निंग संस्था, यांच्या संयुक्त सहकार्याने एक दिवसीय जिल्हास्तरीय कॉम्प्युटर सायन्स हॅकेथॉन उत्सव जिल्हा पातळीवर २० ऑक्टोंबर रोजी २०२४ कुडाळ शहरातील हॉटेल लेमनग्रास येथे संपन्न झाला होता. जिल्ह्यातील जिल्हा परिषद, शाळामधील मधील ग्रामीण, आदिवासी आणि शहरी ११३१ विद्यार्थ्यानी पहिल्या टप्प्यात नोंदणी करून सहभाग घेतला होता. त्यापैकी ८०० विद्यार्थ्यानी अनप्लग (कम्प्युटर शिवाय) चॅलेंज सोडवले होते. या विद्यार्थ्यापैकी या अनप्लग चॅलेंज मधील अचूक मांडणी आणि उत्तमपणे कामगिरी केलेल्या मुलांची या निकषा आधारे जिल्हास्तरावर १० शाळांमधील ३० विद्यार्थ्याची कॉम्प्युटर सायन्स हॅकेथॉन उत्सवासाठी निवड करण्यात आली.
यामध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.

या शाळेला ४३ इंची LED टीव्ही,५ टॅब,अलेक्सा, फिजीकल कम्प्युटिंग कीट, रोख बक्षिस देण्यात आले. 

गेल्यावर्षी सुद्धा हेकेथोन व कॉम्प्युटर कोडींग कोर्स मध्ये शाळेला संगणक लॅब प्राप्त झाली आहे.गेल्या दोन वर्षात सुमारे ४ लाखाचा शैक्षणिक उठाव पारितोषिक रूपाने शाळेला प्राप्त झाला.अशी माहिती मुख्याध्यापक राजन कोरगांवकर यांनी उपस्थित मान्यवरांना दिली.
यावेळी सर्व विद्याऱ्यानी रेकॉर्ड डान्स,आणि सुधा खडगासुर हा दशावतारी नाट्य प्रयोग सादर केला.त्यास पालक वर्गातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी व्यासपीठावर अन्य मान्यवरांमध्ये ग्रा. पं सदस्य वामन गोडे,राजेंद्र शेळके,कविता आंगचेकर,कोळेकर,शाळेचे मुख्याध्यापक राजन कोरगांवकर,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन मराठे,उपाध्यक्ष संजीवनी भोसले,शिक्षक राजेश ठाकूर,दत्ताराम तवटे,शमिका आंगणे,सायली वेंगुर्लेकर,सुभाष तुळसुलकर,लक्ष्मण आईर् पोलीस पाटील आदी उपस्थित होते.
,

error: Content is protected !!