६ खासदार ठाकरेंची साथ सोडणार ?

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गटाच्या ऑपरेशन टायगरची (Shivena Opration Tiger) चर्चा रंगली आहे. ऑपरेशन टायगरमध्ये ठाकरे गटाचे आणि काँग्रेसचे अनेक नेत्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश होणार असल्याचं सांगितलं जात आहे. याचदरम्यान शिवसेनेकडून ऑपरेशन टायगरची तयारी आता पूर्ण झाल्याचं समोर आलं आहे. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार येत्या संसदेच्या अधिवेशनाच्या आधी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून ठाकरे गटाचे नऊ पैकी सहा खासदार शिंदे गटात दाखल होऊ शकतात. आगामी संसदेच्या अधिवेशनाआधी ही मोहीम फत्ते करण्याच्या हालचाली सुरु असल्याची सूत्रांची माहिती आहे. ऑपरेशन टायगरची चर्चा ही अनेक दिवसांपासून होती. पण खासदाराचं तळ्यात मळ्यात सुरू होतं. त्याला कारण पक्षांतर बंदी कायदा… या कायद्यातून वाचायचं असेल तर ठाकरेंचे नऊ पैकी सहा खासदार फुटणं आवश्यक होतं. अन्यथा फुटीर गटावर पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई केली जाऊ शकत होती. त्यामुळे पक्षांतरबंदी कायद्यातून वाचण्यासाठी 6 खासदारांचा आकडा महत्वाचा होता. त्यामुळे एकूणच 6 खासदारांचे मन वळवण्यासाठी वेळ घेतला गेला. अशात अखेर 6 खासदारांचे मन वळवण्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला यश आले असून पडद्यामागे पूर्णपणे जुळणी झाल्याची माहिती आहे.

error: Content is protected !!