सदानंद अणावकर भाजपाचे प्राथमिक सदस्य देखील नाहीत, असल्यास सिद्ध करा, आ. वैभव नाईक यांना आव्हान.
कुडाळ : आ. वैभव नाईक यांच्या खोट्या प्रवेशांचे नाटक सुरूच आहे. त्याचा दुसरा अंक काल अणाव गावामध्ये पाहायला मिळाला मुळातच सेनेत असलेल्या सदानंद अणावकर यांचा खोटा प्रवेश घेऊन वैभव नाईक आपल्या खोट्या कर्तृत्वाचे धिंडोरे पिटत आहेत. सदानंद अणावकर हे भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही पदावर नसून ते भाजपाचे प्राथमिक सदस्य देखील नाहीत. असल्यास वैभव नाईक यांनी पुरावे द्यावेत अस आवाहन भाजपा ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल यांनी केले आहे.
२००३ साली माननीय राणे साहेबांच्या आशीर्वादामुळे सदानंद अणावकर यांनी अणाव गावचे उपसरपंच पद भूषविले परंतु त्यानंतर मात्र त्यांनी राणे साहेबांची साथ सोडली त्यामुळे त्यांना राणे समर्थक बिरुदावली लावण्याचा कोणताही अधिकार नाही अशी टीका भाजपा ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल यांनी केली आहे.