युवतीची छेड काढणाऱ्या ५ जणांना सशर्त जामीन मंजूर

देवगड : देवगड तालुक्यातील युवती छेडछाड विनयभंगप्रकरणी अटक झालेल्या संशयितांपैकी पाच जणांना सिंधुदूर्ग अतिरिक्त सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.

दि. २४ सप्टेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५.३० वा. सुमारास देवगड एस्टी स्टँड येथून घरी जाणाऱ्या कॉलेज युवतीला वसई येथून पर्यटक म्हणून आलेल्या पोलिस कर्मचारी हरीराम मारूती गिते यांने मद्यधुंद अवस्थेत हात पकडून गाडीत ओढण्याचा प्रयत्न करून अपहरणाचा प्रयत्न केला होता. तसेच त्यावेळेस गाडीत बसलेले हरीराम गीते यांचे उर्वरीत ५ साथीदार प्रविण विलास रानडे, सटवा केशव केंद्रे, माधव सुगराव केंद्रे, शाम बालाजी गिते, शंकर संभाजी गिते यांनी सदर युवतीचे अपहरण करण्यासाठी चिथावणी दिली होती. घटनेच्या वेळी त्या युवतीने आरडाओरडा केल्यामुळे जमा झालेल्या नागरिकांनी घटनास्थळावरून पकडून त्यांना बेदम चोप देवून देवगड पोलिसांच्या स्वाधीन केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *