वैभववाडी / प्रतिनिधी :- कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली कोळपे येथील शाखाप्रमुख विश्वजीत माने, ग्रा. पं. सदस्य विलास माने यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे आ. नितेश राणे यांनी भाजपात स्वागत केले.
कोळपे गावातील या मोठ्या प्रवेशाने गावातील उबाठा गट खिळखिळा बनला. आहे आमदार नितेश राणे यांनी दिलेला हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. कोळपे गावातील मानेवाडीतील जवळपास सर्वच ग्रामस्थांनी भाजपात प्रवेश केला. प्रवेश करणाऱ्यांमध्ये उबाठा शाखाप्रमुख विश्वजीत माने, ग्रा.प. सदस्य विलास माने, भिकाजी नारकर, सतीश नारकर, विक्रम नारकर, किशोर माने, किरण माने, वैशाली नारकर, तुकाराम माने, शैलेश माने, उत्तम माने, दिपाली नारकर, रुपाली नारकर, यशोदा नारकर, अनंत नारकर, मारुती नारकर, इब्राहिम नाचरे, रजनीकांत माने, महादेव शेलार, शिवाजी माने, बंड्या कदम, अनंत माने, रुपेश माने, दिनेश माने, कला माने, विनंती माने, सुचित शिंदे, संगीता माने, सविता माने, शितल माने, मनाली शिंदे, शुभांगी शिंदे, विजया शिंदे, सुगंधा शिंदे, सत्यवती कदम आदींचा समावेश आहे.